logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जिल्हा परिषद निवडणूक : नळगीर सर्कलमध्ये गॅस सिलेंडर चिन्हाला पसंती नवीन चेहरा म्हणून श्रद्धा दत्तात्रय गडीकर यांना गावोगावी प्रतिसाद

जिल्हा परिषद निवडणूक : नळगीर सर्कलमध्ये गॅस सिलेंडर चिन्हाला पसंती
नवीन चेहरा म्हणून श्रद्धा दत्तात्रय गडीकर यांना गावोगावी प्रतिसाद
नळगीर सर्कल जिल्हा परिषद निवडणुकीत श्रद्धा दत्तात्रय गडीकर या नवीन चेहऱ्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान गावोगावी नागरिकांचा उत्साह दिसून येत असून निवडणूक वातावरण रंगतदार झाले आहे.
श्रद्धा गडीकर यांचे निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलेंडर’ असून हे चिन्ह मतदारांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे. “गॅस सिलेंडर चिन्ह भारी आहे” अशी प्रतिक्रिया अनेक मतदारांकडून ऐकायला मिळत आहे.
नवीन उमेदवार म्हणून जनतेशी थेट संवाद, साधा प्रचार आणि विकासाचा दृष्टिकोन यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आगामी मतदानात गॅस सिलेंडर चिन्ह दाबून मतदान करा, असे आवाहन नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून नळगीर सर्कलमध्ये निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत आहे.

100
3211 views

Comment