logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प. पु. 108 महंत मधुसूदन भारताजी महाराज यांचे अंतिम दर्शन...

प्रेस नोट
जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड

दिनांक: 04 एप्रिल 2026

माहूरगड येथील श्री दत्त शिखर देवस्थानचे परमपूज्य श्री महंत मालक मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या निधनाची अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी तसेच संबंधित धार्मिक विधींसाठी रविवार दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी दत्तशिखर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्वभूमीवर, माहूर येथे येणाऱ्या सर्व भाविकांना कळविण्यात येते की, शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग तसेच इतर मूलभूत सुविधा यावर ताण येण्याची शक्यता आहे. तसेच माहूर शहर व परिसरातील अनेक आस्थापना काही काळ बंद राहण्याची शक्यता असल्याने बाहेरून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होऊ शकते.

सद्य परिस्थितीत होणारे ट्रॅफिक कोंडी (Traffic Congestion) तसेच आरोग्य सेवा, हॉटेल्स व इतर सुविधांवर येणारा ताण लक्षात घेऊन, भाविकांनी आपल्या प्रवासाचे टप्प्याटप्प्याने नियोजन करावे. तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने प्रशासनामार्फत काही कालावधीत गडावरील वाहतूक नियंत्रित (Regulated) करण्यात येण्याची शक्यता असल्याने, त्यानुसारही भाविकांनी योग्य नियोजन करावे, असे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात येत असून, नागरिक व भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, ही विनंती.

— जिल्हाधिकारी, नांदेड

0
0 views

Comment